
पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांनी १९३६ मध्ये मुंबईतील मलाबार हिल इथं अडीच एक परिसरात आलिशान बंगला बांधला होता. साउथ कोर्ट अस नाव असलेल्या या बंगल्याचं नुतनीकरण केलं जाणार आहे. यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या मंजुरीची आता प्रतीक्षा आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, परराष्ट्र मंत्रालय या बंगल्याला एका डिप्लोमॅटिक एन्क्लेव्हमध्ये रुपांतरीत करण्याच्या तयारीत आहे.