Jitendra Awhad : दाखवतात एक आणि करतात एक अशी भाजपची निती; जितेंद्र आव्हाड यांची टिका

भाजपचे चाल आणि चरीत्र फार वेगळे आहे. ते दाखवतात एक आणि करतात एक अशी भाजपची निती असल्याची टिका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली.
NCP Jitendra Awhad
NCP Jitendra Awhadesakal

ठाणे - भाजपचे चाल आणि चरीत्र फार वेगळे आहे. ते दाखवतात एक आणि करतात एक अशी भाजपची निती असल्याची टिका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. ठाण्यात पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही टिका केली. ठाणे आणि कल्याणच्या जागेवरुन आव्हाड यांना छेडले असता त्यांनी ही टिका केली.

विकासाच्या मुद्यावरुन भाजपला निवडणुका लढवायच्याच नाहीत, दोन कोटी नोकऱ्या देणार होते, काय झाले? आज ८३ टक्के युवक बेरोजगार आहेत, याला जबाबदार कोण असा सवालही त्यांनी केला. हिंदु, मुस्लिम सोडून भाजप कोणताच प्रचार करीत नसल्याचे आमदार आव्हाड यांनी सांगितले. विविध नोकऱ्यांसाठी परप्रांतीय राज्यात आले आहेत.

मराठी माणसाला आता कुठेच स्थान राहिलेले नसल्याचे सांगत, ज्या दिवशी मराठी माणसाला ५० खोक्यांना विकले त्या दिवसापासून मराठी माणसाचे स्थानही गमावले गेल्याची खंतहि आव्हाड यांनी यावेळी बोलून दाखवली. निवडणुकीत खुले आम अमिषे दाखविले जात असल्याबाबत त्यांना विचारले असता, बेशीस्तपणाने भाजपवाले वागत असून निवडणुक विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

निवडणुक विभाग हे भाजपवाल्यांच्या हातचे बाहुले असल्याची टिकाही त्यांनी केली. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की ही जागा आपल्यालाच मिळावी, त्यातून रुसवे फुगवे होत असतात. परंतु वरीष्ठ नेते त्यांची मनधरणी करतील असेही ते म्हणाले. तुमच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत, म्हणून शरद पवार हे संकोचित आहेत असे म्हणावे लागत असल्याचे सांगत आव्हाड यांनी प्रफुल पटेल यांच्यावर टिका केली.

दरम्यान, सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या रक्ताच्या आहेत, आणि त्यांना जर राजकीय फायदा घ्यायचाच असता तर त्यांनी सुप्रिया सुळे पवार असे नाव लावले असते. त्यात अशा निवडणुका या कर्तुत्वावर लढवाव्या लागतात. तुमचा लोकसभेमधील परफॉर्मस काय यावर लढविल्या जातात असेही ते म्हणाले.

निवडणुकीचे काहीच मुद्दे राहिलेले नसल्याने आणि तुम्हाला आता कॉन्फिडन्स आलेला असून आता आपले काहीच चालू शकत नाही, हे कळून चुकले असल्यानेच असे मुद्दे काढत असल्याची टिकाही त्यांनी अजित पवार यांच्यावर केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com