"गरीबांवर अन्याय केल्यास सरळ करू!" जितेंद्र आव्हाड यांचा 'टोरंट'ला इशारा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 July 2020

वाढीव वीजबिलाबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी समाजमाध्यमांद्वारे टोरंट वीज कंपनीने कळवा-मुंब्र्यातील गरीब ग्राहकांवर अन्याय केल्यास त्यांना सरळ करू, असा इशारा दिला आहे. यासंदर्भात 'टोरंट'च्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी सोमवारी (ता. 6) ते कंपनीच्या कळवा-मुंब्र्यातील कार्यालयात धडक देणार आहेत.

कळवा : वाढीव वीजबिलाबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी समाजमाध्यमांद्वारे टोरंट वीज कंपनीने कळवा-मुंब्र्यातील गरीब ग्राहकांवर अन्याय केल्यास त्यांना सरळ करू, असा इशारा दिला आहे. यासंदर्भात 'टोरंट'च्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी सोमवारी (ता. 6) ते कंपनीच्या कळवा-मुंब्र्यातील कार्यालयात धडक देणार आहेत.

मोठी बातमी : मुंबईतील 'या' बड्या रुग्णालयाविरोधात FIR दाखल, रुग्णांची लूट सुरु असल्याचा आरोप

कळवा-मुंब्र्यात मार्च ते मे या तीन महिन्यांच्या लॉकडाऊनच्या काळात 'टोरंट' वीज ग्राहकांना वाढीव वीजबिले आली आहेत. कळवा व मुंब्रा भागांत जास्तीत जास्त वीज ग्राहक चाळी व झोपडपट्टी भागात राहतात. लॉकडाऊन काळात अनेक गरीब कुटुंबांना हाताला काम नव्हते. तसेच बरीच कुटुंब गावी गेली आहेत. असे असताना या तीन महिन्यांत सरासरी बिलापेक्षा वाढीव बिले आली आहेत. त्यामुळे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबाला ही बिले भरणे अवघड झाले. त्यासंदर्भात अनेक वीज ग्राहकांच्या तक्रारी आव्हाड यांच्याकडे आल्या आहेत. या प्रश्नावर मागील काही दिवसांपासून मनसे, भाजप ही वाढीव बिले कमी करण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. आता या प्रश्नावरती राष्ट्रवादीनेही कंबर कसली असून, यासंदर्भात कठोर भूमिका घेतली आहे. ही वीजबिले कमी करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. 

ही बातमी वाचली का? अरे बापरे ! आता संजय गांधी नॅशनल पार्कमधल्या आनंद वाघालाही...

मार्च ते मे या कालावधीत अनेक कुटुंब घरीच होती. त्यामुळे विजेचा वापर जास्त झालेला आहे. त्यानुसारच सरासरी बिले काढली आहेत; परंतु मंत्री महोदयांकडून ज्या वाढीव बिलांच्या ग्राहकांच्या तक्रारी आल्या तर त्यांचे पुन्हा रिडींग घेऊन तत्काळ त्यांच्या तक्रारीचे निरसन करू.
-चेतन बदियानी, जनसंपर्क अधिकारी, टोरंट वीज कंपनी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jitendra Awhad Hits Torrent on Monday, Will discuss with the authorities regarding the increased electricity bills