मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जितेंद्र आव्हाडांनी सुचवली 'ही' कल्पना...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 May 2020

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी पुर्नविकासाची एक कल्पना सुचवली आहे.

मुंबई- राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी पुर्नविकासाची एक कल्पना सुचवली आहे. मुंबईत कोरोनाचा प्रार्दुभाव जास्त आहे. त्यातच धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून धारावी पुर्नविकासाची हीच ती वेळ असल्याचं म्हटलं आहे. 

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीला आता कोरोना हॉटस्पॉट अशी नवी ओळख मिळाली आहे. धारावीत २ चौ.किमी. परिसरात १२ ते १५ लाख नागरिक दाटीवाटीने राहातात. एरवी स्वतःच्या कामांच्या लगबगीत असणारी धारावी सध्या कोरोनाच्या छायेत वावरत आहे. येथे योग्य-आरोग्य सुविधा नसल्याने धारावीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. युतीचं सरकार असताना धारावी पुर्नविकासाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जर आपण हा विकास केला तर आपल्या राजकीय विरोधकांना आणि विरोधी पक्षांना मोठा सोशल इम्पॅक्ट होईल, असं आव्हाडांनी पत्रात म्हटलं आहे. 

मोठी बातमी - कोविडचा सामना करण्यासाठी सरकारकडून जम्बो सुविधा केंद्राचा निर्णय...

धारावीचा पुर्नविकास केल्यास महाविकास आघाडीला यामुळे मोठा राजकीय फायदा होईल. तसंच या परिस्थितीत बांधकाम व्यवसायाला मोठा चालना देखील मिळेल. कोरोना व्हायरसमुळे सध्या मुंबईची आर्थिक घडी जी विस्कटली आहे. ती घडी पुन्हा पूर्वपदावर येण्यासही मदत होऊ शकते, असंही जितेंद्र आव्हाडांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे. 

धारावीसारख्या सर्व जाती धर्माच्या वस्तीच्या भागाचा विकास केल्यास तो विकास महाविकास आघाडी सरकारसाठी राजकीयदृष्ट्या हिताचं ठरेल हे नक्की आहे. याबाबतची संपूर्ण प्रक्रिया झाली असून आपण आपल्या स्तरावर एक बैठक बोलावावी. त्या बैठकीत धारावी पुनर्विकास प्रकल्प लवकरात लवकर सुरु करण्याचं आदेश द्यावेत, अशी विनंतीही जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

जितेंद्र आव्हाडांची कोरोनावर मात

जितेंद्र आव्हाडांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. आव्हाड आता कोरोनामुक्त झाले असून त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. आव्हाड सध्या आपल्या घरी विश्रांती घेताहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याची माहिती स्वतः त्यांनी ट्विट करुन दिली आहे. 

एकीकडे कोरोनाची लढाई, दुरीकडे भाजपचे ‘टार्गेट उद्धव ठाकरे’; असं आहे भाजपचं नियोजन

काही दिवसांपूर्वी आव्हाड हे मुंबईतल्या काही कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आले होते.  त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन केलं होतं. त्यानंतर आव्हाडांना अचानक ताप आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या सुरक्षा रक्षकांपैकीही एकाला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली होती. ठाणे नगरपालिकेचे पीआरओ संदीप मालवी यांनी सांगितल्यानंतर, आव्हाडांचे स्वॅब सॅँपल चाचणीसाठी पाठवले होते. रिपोर्ट आल्यानंतर आव्हाडांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाले होते. 

जितेंद्र आव्हाडांनी स्वतःट्विट करुन याबाबत माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईस यश आलेलं असून मी आज सुखरूप घरी जात आहे. यापुढे ही तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असंच राहू द्या. परत एकदा त्याच उत्साहात आणि त्याच जोमात पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढण्यास सज्ज होऊया.

jitendra awhad writes letter to CM uddhavthackeray and suggested this idea


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jitendra awhad writes letter to CM uddhavthackeray and suggested this idea