Raj Thackeray Strong Reaction
esakal
''आयआयटी बॉम्बेच्या नावातील ‘बॉम्बे’ तसेच ठेवले. त्याचे मुंबई केले नाही हे चांगलेच झाले. यामुळे मी खूश आहे'', असं विधान केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी काल केले होतं. त्यांच्या या विधानानंतर आता मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरून आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आता त्यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.