हापूस, द्राक्षांची  परदेशवारी रखडली 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

मुंबई - जवाहरलाल नेहरू बंदरातील (जेएनपीटी) स्थानिक वाहतूकदारांच्या आंदोलनाचा फटका भाज्यांसह हापूस, द्राक्ष, डाळिंब या फळांनाही बसला आहे. या संपामुळे परदेशात जाणाऱ्या कृषिमालाचे चारशेहून अधिक कंटेनर ‘जेएनपीटी’मध्ये अडकून पडले आहेत.

भारतातून आखाती देशांत फळांची निर्यात होते. वाहतूक ठप्प असल्याने निर्यातीसाठीचा हापूस बंदरात पोचलेला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी गुरुवारपासून हापूस आंबा पाठवणे बंद केल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी संजय पानसरे यांनी दिली.

संप कशासाठी? 
आयात-निर्यातीच्या वाहतुकीसाठी ‘जेएनपीटी’ने निविदा काढल्या होत्या. हे काम चार कंत्राटदारांना मिळाले आहे. बंदर ते कारखाना अशी वाहतूकही याच कंपन्या करणार आहेत. त्याविरोधात २० वाहतूकदार संघटनांनी बुधवारपासून बेमुदत असहकार आंदोलन सुरू केले आहे.

‘जेएनपीटी’चा व्याप
१५ हजार कंटेनर
दिवसभरातील आयात निर्यात
१७ हजार कंटेनर 
संपामुळे रखडले 

Web Title: JNPT Transporter movment