जोगलवाडीच्या शाळेला मिळाला शिक्षक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

सकाळ'ने 29 जुन ला 'पालकांनी ठोकले शाळेला टाळे' या ठळक मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली. त्यामुळे आदिवासी पालकांच्या रास्त मागणीच्या आंदोलनाला बळ मिळाले.

मोखाडा -  गेली वर्षभर मागणी करूनही  जोगलवाडी जिल्हा परिषद शाळेला शिक्षक मिळत नव्हता, त्यामुळे तेथील पालकांनी शाळेला टाळे ठोकले होते. या घटनेची सविस्तर बातमी 'सकाळ'ने 29 जुन ला 'पालकांनी ठोकले शाळेला टाळे' या ठळक मथळ्याखाली प्रसिद्ध केली. त्यामुळे आदिवासी पालकांच्या रास्त मागणीच्या आंदोलनाला बळ मिळाले. मात्र, बातमी ने प्रशासनाची पाचावर धारण झाली. बातमीची तातडीने दखल घेत मोखाडा गटशिक्षणाधिकारी यांनी भरत गारे या शिक्षकाला तेथे प्रतिनियुक्त शिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. त्यामुळे जोगलवाडी च्या पालकांनी व विद्यार्थ्यांनी 'सकाळ'चे अभिनंदन केले आहे. 

मोखाड्यातील जोगलवाडी जिल्हा परिषद शाळेत 1 ते 5 वी पर्यंत वर्ग आहेत. मात्र, गेली वर्षापासून केवळ एक शिक्षक या वर्गांना ज्ञानार्जनाचे काम करत होता. दुसरा शिक्षक मिळावा म्हणून, येथील स्थानिक व्यवस्थापन समिती आणि पालकांनी सतत दहा महिने मोखाडा पंचायत समिती शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला होता. शिक्षक मिळत नाही, त्यामुळे आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान टाकण्यासाठी येथील पालकांनी शाळेला टाळे ठोकले. या घटनेची सविस्तर बातमी 'सकाळ'ने 29 जुन ला 'पालकांनी ठोकले शाळेला टाळे' या ठळक मथळ्याखाली प्रसिद्ध केली.

बातमीची दखल घेत पालघर जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते प्रकाश निकम, मोखाडा पंतायत समिती चे सभापती प्रदीप वाघ, यांसह शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुख यांनी जोगलवाडी शाळेला भेटी दिल्या आहेत. तसेच पालकांच्या भेटी घेतल्या आहेत. मात्र, पालक आपल्या मागणीवर ठाम होते. अखेर 30 जुन ला भरत गारे या शिक्षकाला येथे प्रतिनियुक्त शिक्षक म्हणून तातडीने नियुक्त केले आहे. तसेच नियमित शिक्षक हजर होत नाही तोपर्यंत तेथेच सेवा करण्याचे आदेश मोखाडा पंचायत समिती शिक्षण विभागाच्या गटशिक्षण अधिकारी श्रीमती जयश्री पठाणे यांनी दिले आहेत. त्यामुळे 30 जुन ला शाळा नियमित सुरू झाली आहे. 
             
'सकाळ'ने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताची बातमी देऊन, प्रशासनाला ताळ्यावर आणल्याने जोगलवाडीच्या पालकांनी 'सकाळ'चे अभिनंदन केले आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Jogalwadi school gets a teacher