esakal | जोगेश्‍वरी येथे मूकबधीर महिलेवर लैगिंक अत्याचार; गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

crime

जोगेश्‍वरी येथे मूकबधीर महिलेवर लैगिंक अत्याचार; गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जोगेश्‍वरी (jogeshwari) येथे राहणार्‍या मूकबधीर असलेल्या महिलेवर (women molestation) लैगिंक अत्याचार करुन पाच वर्षांच्या तिच्याकडून घेतलेल्या सुमारे ४० लाख रुपयांचा अपहार (money fraud) करुन फसवणुक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी प्रियकरासह गुन्ह्यांत मदत करणार्‍या चार मित्रांविरुद्ध जोगेश्‍वरी पोलिसांनी (jogeshwari police) लैगिंक अत्याचारासह अपहार आणि फसवणुकीच्या कलमांतर्गत गुन्हा (police FIR) नोंदविला आहे.

हेही वाचा: बाप्पाचे आगमन सुकर करण्यासाठी ट्रॅफिक पोलीस डे-नाईट ऑन ड्युटीवर

विशेष म्हणजे पाचही आरोपीदेखील मूक-बधीर असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या आरोपींच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ४६ वर्षांची पिडीत महिला जोगेश्‍वरी परिसरात राहत असून ती जन्मापासून मूकबधीर आहेत. ती सध्या भारतीय रेल्वेमध्ये कामाला आहे. तिच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. पाच वर्षांपूर्वी तिची दादर रेल्वे स्थानकात आरोपी संतोषकुमार याच्याशी ओळख झाली होती. संतोषकुमार हादेखील मूकबधीर असल्याने त्यांची मैत्री झाली होती. तो मूळचा आंधप्रदेशचा रहिवाशी होता. त्याची मुंबई शहरात राहण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे त्याने तिला तिच्या घरी आश्रय देण्याची विनंती केली होती.

तिनेही माणुसकीच्या नात्याने त्याला तिच्या घरी राहण्याची परवानगी केली होती. याच दरम्यान त्याने तिला प्रपोज करुन लग्नाची मागणी घातली होती. याच दरम्यान त्यांच्यात शारीरिक संबंध आले होते. संतोषकुमार हा काहीच कामधंदा करीत नव्हता. त्यामुळे तो अनेकदा तिच्याकडून पैसे घेत होता. गेल्या पाच वर्षांत त्याने तिच्याकडून टप्याटप्याने सुमारे ४० लाख रुपये घेतले होते. याकामी त्याला त्याच्या मूकबधीर असलेल्या चार मित्रांनी मदत केली होती. अनेकदा तो त्यांना तिचे एटीएम कार्ड देऊन पैसे काढण्यास सांगत होता. याच पैशांतून त्याने कार, बाईक, लॅपटॉप, मोबाईलसह इतर महागड्या वस्तू खरेदी केले होते. याच दरम्यान तो त्याच्या गावी निघून गेला आणि परत आला नाही. त्यामुळे तिने त्याच्या गावी जाऊन त्याची भेट घेतली.

हेही वाचा: सकाळ ॲग्रोवनच्या ‘सुगरण’ स्पर्धेचा मुंबईच्या महापौरांनी केला शुभारंभ

यावेळी त्याला संतोषकुमार हा विवाहीत असल्याचे समजले. तिने त्याला लग्नाविषयी विचारणा केल्यानंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास स्पष्टपणे नकार दिला. तिला मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती. संतोषकुमारने तिच्याशी प्रेमाचे नाटक करुन तिच्याकडील पैशांचा अपहार करुन तिची फसवणुक केल्याचे निदर्शनास येताच तिने जोगेश्‍वरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्याच्यासह त्याच्या चार मूकबधीर मित्रांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी या पाचही आरोपीविरुद्ध विविध भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांत अद्याप कोणालाही अटक झाली नसून आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सागितले.

loading image
go to top