Borivali Station But a New Chapter of Life Begins pregnant woman delivery
sakal
विरार - नालासोपऱ्यहून कांदिवलीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या ३५ वर्षीय गर्भवती महिलेचा १३ ऑगस्ट रोजीचा रेल्वे प्रवास अचानक आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या क्षणात बदलला. बोरीवली रेल्वे स्थानकात पोहोचताच महिलेला तीव्र प्रसूतीकळा सुरू झाल्या आणि कोणत्याही क्षणी प्रसूती होण्याची शक्यता निर्माण झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे कर्मचाऱ्यांनी वेळ न दवडता महिलेला बोरीवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर असलेल्या EMR – इमर्जन्सी मेडिकल रिस्पॉन्स सेंटरमध्ये दाखल केले. या केंद्राचे संचालन एपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सतर्फे केले जाते.