न्यायाधीशांच्या समितीमार्फत चौकशीसाठी याचिका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

मुंबई - केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयातील न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची चौकशी सात न्यायाधीशांच्या समितीने करावी, अशा मागणीची याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. संजय भालेराव या सामाजिक कार्यकर्त्याने वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. 

न्या. लोया यांच्यापुढे सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणाची सुनावणी सुरू होती. या खटल्यात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह काही वरिष्ठ पोलिस अधिकारी आरोपी होते. नागपूर येथे ३० डिसेंबर २०१४ रोजी न्या. लोया यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर महिनाभरात नव्या न्यायाधीशांनी या प्रकरणी अमित शहा यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दोषमुक्त केले.

Web Title: Judge Committee Inquiry Petition