Juhu Murder Case
ESakal
मुंबई
Juhu Murder Case: विवाहबाह्य संबंधातून हत्या, पत्नीच्या प्रियकराला अटक; जुहू किनाऱ्यावरील मृतदेहाचं गूढ उकललं
Mumbai Crime: जुहू किनाऱ्यावर शीर नसलेला मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ पसरली होती. मात्र याबाबत आता पोलिसांनी गूढ उकलले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Juhu Crime : जुहू किनाऱ्यावर शीर नसलेला मृतदेह वाहून आल्याने परिसरात घबराट पसरली होती. सांताक्रूझ पोलिसांनी अवघ्या १२ तासांत या मृतदेहाचे गूढ उकलले. अशोक गौड असे मृत तरुणाचे नाव असून, पत्नीच्या प्रियकराने त्याची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वाहिद अली शेख उर्फ मिट्टू (वय ३०) यास मंगळवारी अटक केली. विवाहबाह्य संबंधात अशोक अडसर ठरत असल्याने त्याची हत्या केल्याचे आरोपी अशोकने कबूल केल्याचा दावा पोलिसांनी केला.

