रविवारी हार्बर, पश्‍चिम रेल्वे मार्गावर जम्बो ब्लॉक!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 मार्च 2020

हार्बर रेल्वे मार्गावरील कुर्ला-वाशी आणि पश्‍चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान रविवारी (ता. १५) ब्लॉक घेण्यात आला आहे; तर मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉक नसेल.

मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरील कुर्ला-वाशी आणि पश्‍चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान रविवारी (ता. १५) ब्लॉक घेण्यात आला आहे; तर मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉक नसेल. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पश्‍चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे राम मंदिर स्थानकावर लोकलला थांबा नसेल; तर ब्लॉकवेळी सीएसएमटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल या मार्गावर विशेष लोकल धावतील. 

ही बातमी वाचली का? कोरोनाच्या पार्श्वभुमीवर एमपीएससीच्या परिक्षांसंदर्भात महत्त्वाची बातमी

हार्बर रेल्वे 
कुर्ला-वाशी दरम्यान दोन्ही मार्गावर 
कधी ः सकाळी १०.३४ ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत 
परिणाम ः सीएसएमटी ते वाशी/नेरूळ/पनवेल दरम्यानच्या दोन्ही मार्गावरील लोकल सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ वाजेपर्यंत लोकल सेवा बंद करण्यात आली आहे; तर सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल या मार्गावर विशेष लोकल चालविण्यात येणार आहे.

ही बातमी वाचली का? वाचा काय आहे हापूस प्रेमींसाठी गोड बातमी

पश्‍चिम रेल्वे 
सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान ब्लॉक 
कधी ः सकाळी १०.३५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत 
परिणाम ः सांताक्रूझ ते गोरेगाव दोन्ही दिशेकडील धीम्या मार्गावर जम्बो ब्लॉक आहे. ब्लॉकमुळे सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर धावतील. जलद मार्गाचे फलाट नसल्याने राम मंदिर स्थानकावर लोकलला थांबा नसेल.

ही बातमी वाचली का? ४० गावांना गढूळ पाणीपुरवठा

जम्बो ब्लॉकदरम्यान पर्यायी व्यवस्था
हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला-वाशी दरम्यान मेगाब्लॉक असल्याने पनवेलवरून सीएसएमटीला जाणाऱ्या प्रवाशांना वाशी रेल्वेस्थानकाच्या बाहेरून हायवे महामार्गावरून एसटी महामंडळाच्या बसने कुर्ला, मुंबई सेंट्रल किंवा दादरपर्यंत पोहचता येणार आहे किंवा कुर्ला येथे पोहचून तेथून लोकलने प्रवास करता येणार आहे. त्याशिवाय ट्रान्स हार्बर मार्गावरून मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गाने सीएसएमटी पोहचता येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jumbo Block on Harbor, Western Railway Sunday!