esakal | म्हणून 26/11 दहशतवादी हल्ला खटल्यातील बाल साक्षीदाराने न्यायालयात घेतलीये धाव
sakal

बोलून बातमी शोधा

म्हणून 26/11 दहशतवादी हल्ला खटल्यातील बाल साक्षीदाराने न्यायालयात घेतलीये धाव

हालाखीच्या परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या 26/11 दहशतवादी खटल्यातील बाल साक्षीदाराने आता राज्य सरकारकडून निवासस्थान आणि शिक्षणाच्या मदतीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

म्हणून 26/11 दहशतवादी हल्ला खटल्यातील बाल साक्षीदाराने न्यायालयात घेतलीये धाव

sakal_logo
By
सुनीता महामुणकर

मुंबई : हालाखीच्या परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या 26/11 दहशतवादी खटल्यातील बाल साक्षीदाराने आता राज्य सरकारकडून निवासस्थान आणि शिक्षणाच्या मदतीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मुंबई दहशतवादी हल्ला खटल्यात त्यावेळी नऊ वर्षाची असलेल्या देविका रोटावत या 21 वर्षीय तरुणीने न्यायालयात याचिका केली आहे. वांद्रे येथील एका चाळीत राहणाऱ्या देविका आणि तिच्या कुंटुंबियांची परिस्थिती हलाखीची आहे. भाड्याच्या घरात ते सध्या राहतात. मात्र घराचे भाडे न भरल्यामुळे त्यांना आता बेघर होण्याची वेळ आली आहे, त्यामुळे सरकारने एक घर द्यावे अशी मागणी केली आहे. ती सध्या चेतना महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करण्याची मागणीही तीने याचिकेत केली आहे. अनेक अडचणींमुळे तिचे वडील आणि भाऊ घरखर्च चालवू शकत नाहीत, असेही तिने म्हटले आहे.

मोठी बातमीआदित्य ठाकरेंनी नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र, पत्रास कारण की

लष्कर ए तोयबाचा अतिरेकी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदाराने सन 2008 मध्ये मुंबईवर हल्ला केला होता. त्यावेळी सीएसटीवरील हल्ल्यात बंदुकीची एक गोळी तिच्या उजव्या पायाला लागली होती. तिच्याबरोबर तिचे वडीलही होते. पोलिसांनी तीला सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. तिथे तिच्यावर दिड महिन्यात सहा शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. त्यानंतर सुमारे सहा महिने घरीच सक्तीची विश्रांती घेत होती. या खटल्यात ती आणि तिचे वडील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. मागील काही वर्षात तीने सरकारकडून सहाय्य मिळण्यासाठी अनेक पत्रव्यवहार केले, पण त्याची दखल घेतली नाही, असे म्हटले आहे.

junior witness of 2611 mumbai terror attack files petition in mumbai high court

loading image
go to top