जंक फूडमुळे विशीतच मधुमेह, हृदयविकार!

junk food
junk food

मुंबई : जंकफूडच्या आहारी गेलेल्या पाचपैकी एका बालकामध्ये लठ्ठपणा आढळत आहे. हा बालक विशीच्या उंबरठ्यावर पोहचेल तेव्हाच त्याला मधुमेह आणि हृदयविकारासारख्या आजाराने ग्रासलेले असेल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त करत आहेत.  

राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शैक्षणिक संस्थांमध्ये जंकफुड बंदीचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी ऑक्‍टोबरपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वीच मुंबईतील २५ शाळांनी उपाहारगृहातील खाद्यपदार्थ बदलले असून पूर्वीच्या जंकफुडच्या जागी सकस खाद्यपदार्थ विकण्यास सुरुवात केली आहे. या शाळांचा गुरुवारी (ता. २२) ‘एफडीए’तर्फे गौरव करण्यात आला. या वेळी लेप्रोस्कोपिक आणि बेरिएट्रीक सर्जन डॉ. जयश्री तोडकर यांनी तीन वर्षांपुढील प्रत्येक पाचपैकी एका बालकामध्ये लठ्ठपणा आढळत असल्याची धक्कादायक माहिती दिली. 

इंडियन इन्स्टिट्युट ऑफ केमिकल टेक्‍नॉलॉजीच्या फुड इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्‍नॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. उदय अन्नापुरे यांनीही अशा बालकांच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली. हा लठ्ठपणा योग्य वयात नियंत्रणात आणणे गरजेचे आहे, नाहीतर वयाच्या विशीत पोहचेपर्यंत या मुलांना हृदयविकार आणि मधुमेहासारखे आजार जडलेले असतील, अशी भिती डॉ. अन्नापुरे यांनी व्यक्त केली. 
आहारतज्ज्ञ डॉ. जगमित मदन यांनीही लठ्ठपणा रोखणे गरजेचे असल्याचे मत मांडले. न्याहारीत सकस आहाराचा समावेश असावा, असे मत सेलिब्रिटी शेफ हरपालसिंग सोखी यांनी व्यक्त केले.

सकस आहाराची सवय मुलांना लावायला हवी. अन्न व औषध प्रशासनाने पौष्टिक, सुरक्षित व स्वच्छ अन्नपदार्थांची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. जंकफूडपासून युवापिढीला वाचवण्यासाठी ही मार्गदर्शक तत्त्वे नक्कीच फायदेशीर ठरतील.
- डॉ. पल्लवी दराडे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com