
Juvenile Delinquency
ESakal
जयेश शिरसाट
मुंबई : अल्पवयीन तरुणांकडून घडणाऱ्या गुन्ह्यांच्या सर्वाधिक घटना महाराष्ट्रात नोंद झाल्या आहेत. राज्यात घटनांचा आलेख सतत चढा असताना सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या मुंबईत मात्र बालगुन्हेगारीचे प्रमाण नागपूर, पुणे शहरापेक्षा बरेच कमी असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) अहवालावरून स्पष्ट होते.