कडकनाथ कोंबडी शेतकऱ्यांचा मुंबईत एल्गार; 'या' आहेत मागण्या

कडकनाथ कोंबडी शेतकऱ्यांचा मुंबईत एल्गार; 'या' आहेत मागण्या

गेल्या अनेक महिन्यांपासून आपण कडकनाथ कोंबडी आंदोलनाबद्दल ऐकतोय. याच कडकनाथ कोंबडी शेतकऱ्यांचा आज मुंबईत धडकलेला पाहायला मिळाला. कडकनाथ कोंबडी शेतकरी आपल्या मागण्यांसाठी धडकले ते थेट मुंबईत. महाराष्ट्रात आता नवीन सरकार आहे. अशात नवीन सरकारने आपल्याला वेळ द्यावा, आपल्या मागण्या ऐकून घ्याव्या आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा घेऊन हे शेतकरी मुंबईत धडकलेत. महारयत कंपनीकडून या शेतकऱ्यांची फसवणून केली गेल्याचा या शेतकऱ्यांचा आरोप आहे   

कडकनाथ कोंबडी घोटाळ्याविरोधात निघालेला मोर्चा आज मुंबईच्या मंत्रालयावर धडकणार आहे. कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीने बेळगावमधून मोर्चाला सुरुवात केली होती. काल हा मोर्चा कोल्हापूर  सातारा मार्गे पुण्यात पोहोचला होता. आज हा मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झालाय. जवळपास दोन हजार शेतकरी एकत्र येऊन हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार होता. मात्र त्यांना परवानगी नाकारण्यात आल्याने या आंदोलकांनी आझाद मैदानात निदर्शनं सुरु केली आहे. या प्रकरणामध्ये कंपनीने केलेल्या फसवणुकीमध्ये कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालंय. त्यांनी या प्रकरणामध्ये त्वरित न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. 

या आधीच्या सरकारने आम्हाला फक्त आश्वासनं दिलीत. खुद्द तत्कालीन राज्य कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या सुपुत्राकडून हा घोटाळा करण्यात आल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आम्ही गेले अनेक दिवस आमच्या न्यायासाठी रस्त्यावर आंदोलन करतोय, रस्त्यावरील लढाई लढतोय, अनेकदा निवेदनं देखील देण्यात आलीत. शेवटी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर कोंबड्या देखील फेकण्यात आल्यात. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. मागील सरकार गेंड्याच्या कातडीचं होतं असंही या शेतकऱयांनी म्हटलंय. 

गेल्या चार महिन्यांपासून कडकनाथ कोंबडी शेतकरी हे न्यायासाठी आंदोलन करतायत. यामध्ये तब्बल ८५०० शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याची माहिती यावेळी उपस्थित शेतकऱयांनी दिली. या कोंबड्यांच्या वाढीसाठी कंपनीने खाद्य पुरवठा बंद केल्याने दिवसाला साधारण लाखभर कोंबड्या दगावल्या. यामुळे आमचं आर्थिक नुकसान तर झालंच पण प्रचंड मानसिक नुकसान देखील झाल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.    

महाराष्ट्रात आता सत्ताबदल झालाय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरवातीपासूनच कामांचा धडाका लावलाय. अशातच या सरकारकासून कडकनाथ कोंबडी शेतकऱयांना मोठ्या आशा आहेत. त्यामुळे एका मागोमाग एक निर्णय घेणाऱ्या ठाकरे सरकारकडून या शेतकऱयांना कसा न्याय मिळतोय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.   

kadakanath chicken farmers agitation in mumbai these are demands 
  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com