काळाचौकी पुनर्विकास प्रकल्प प्रकरणी विकसकाला दणका! न्यायालयाकडून इरादा पत्र रद्द करण्याचा निर्णय कायम

Mumbai High Court: मुंबईतील काळाचौकी पुनर्विकास प्रकल्प प्रकरणात विकसकाला न्यायालयाने मोठा दणका दिला आहे.
Court

Court

sakal

Updated on: 

मुंबई : जवळपास दोन दशके काळाचौकीतील एका गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांनी पुनर्विकासामार्फत स्वतःच्या हक्काचे घर मिळवण्याचे पाहिलेले स्वप्न विविध कारणांमुळे सतत लांबणीवर पडत गेल्याची उच्च न्यायालयाने नुकतीच गंभीर दखल घेतली. इरादा पत्र रद्द करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाला आव्हान देणारी ओम शांती प्रॉपर्टीज आणि त्यांच्या भागीदारांनी केलेली याचिका फेटाळली. यामुळे या प्रकल्पातील रहिवाशांची जवळपास दोन दशकांची प्रतीक्षा संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...