मुंबईत भाजपची ताकद आणखी वाढणार; काँग्रेस आमदार करणार प्रवेश

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 26 जुलै 2019

काॅंग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या आधी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्याही चर्चा होत्या.

मुंबई : काॅंग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या आधी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्याही चर्चा होत्या.

काॅंग्रेस बंडखोर आमदार कालिदास कोळंबकर आता 30 जुलैला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपासून मुख्यमंञ्यांच्या जवळ असणारे कोळंबकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अचानक भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kalidas kolamkar may Enters in BJP