Kalyan: २७ गावांसाठी ३५७ कोटींची पाणीपुरवठा योजना; १०५ दलघमी साठवण क्षमता होणार निर्माण

KDMC Latest News: अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा, पर्जन्य जलवाहिनी, नागरी परिवहन व हरित क्षेत्र विकास इत्यादी पायाभूत सुविधांची निर्मिती शहरांत करण्यात येत आहे.
Kalyan: 357 crore water supply scheme for 27 villages 105 Dalghmi storage capacity is going to be created thane kdmc
Kalyan: 357 crore water supply scheme for 27 villages 105 Dalghmi storage capacity is going to be created thane kdmc sakal
Updated on

Kalyan Latest News: कल्याण-डोंबिवली शहरांसाठी अमृत योजनेअंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे कल्याण-डोंबिवली शहरांसह नव्याने समाविष्ट २७ गावांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी मदत होणार आहे.

यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार राजेश मोरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे. यामुळे २७ गावांतील नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच १०५ दलघमी साठवण क्षमता निर्माण होणार आहे.

Kalyan: 357 crore water supply scheme for 27 villages 105 Dalghmi storage capacity is going to be created thane kdmc
जलवाहिनी फुटल्याने कल्याणमधील नागरिकांचे हाल
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com