

stray dogs killed case
ESakal
कल्याण : महिनाभरापूर्वीच कल्याणमध्ये काही इसमांनी उंदराचे औषध देऊन भटक्या कुत्र्यांना मारल्याची धक्कादायक घटना घडली होती. कल्याणमधील धामटण गाव हद्दीत तीन इसमांनी जागोजागी उंदीर मारण्याचे औषध टाकून सात भटक्या कुत्र्यांना मारले होते. या प्रकरणी प्राणीप्रेमी तसेच नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता. कल्याणमधील भटक्या कुत्र्यांना मारण्याचे हे प्रकरण निवळले नसताना पुन्हा अशीच घटना घडली आहे.