esakal | कल्याण : हातभट्टीवरील 300 लिटर गावठी दारू जप्त; एकाला अटक| Alcohole update
sakal

बोलून बातमी शोधा

Alcohole seized

कल्याण : हातभट्टीवरील 300 लिटर गावठी दारू जप्त; एकाला अटक

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण-शीळ रोडवरील गोलवली येथे हातभट्टीवरील गावठी दारू (Alcohole selling) विक्रीस आलेल्या एका 30 वर्षीय तरुणाला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने (Kalyan CID) अटक केली आहे. योगेश देवकर (yogesh devkar arrested) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून 300 लिटर गावठी दारूसह सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा: अनिल देशमुख बेपत्ता होण्यास राज्य सरकार जबाबदार आहे का ? - प्रसाद लाड

गोलवली गावातील एस.जी मोटार्स च्या समोरील मोकळया मैदानात बैठया चाळीजवळ एक व्यक्ती कारमधून गावठी दारू विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारमार्फत कल्याण गुन्हे अन्वेषण विभागास मिळाली. माहितीच्या आधारे प्रभारी पोलिस निरीक्षक विलास पाटील, पोलीस उप निरीक्षक मोहन कळमकर, पोलीस हवालदार मंगेश शिर्के, पोलिस शिपाई अजित राजपुत, वानखेडे, नवसारे यांच्या पथकाने मोकळ्या मैदानात सापळा रचून शुक्रवारी रात्री 12 च्या सुमारास योगेश याला अटक केली.

मोटरकारची झडती घेतली असता त्यामध्ये 300 लिटर गावठी हातभट्टी दारू ओळीसना मिळुन आली. गावठी दारूसह 1 लाख 15 हजाराचा मुद्देमाल यामध्ये जप्त करण्यात आला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश याच्यावर यापूर्वी रायगड जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 3 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

loading image
go to top