Ramesh Mhatre: रमेश म्हात्रे यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला कोर्टाचा नकार? ‘फिजिकली हजर करा’, न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

Ramesh Mhatre Doctor's Assult Case: केडीएमसीच्या रुग्णालयात मारहाण प्रकरणातील आरोपी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या कोठडीसंदर्भातील सुनावणीत कल्याण न्यायालयाने महत्त्वाची भूमिका घेतली आहे.
Ramesh Mhatre

Ramesh Mhatre

ESakal

Updated on

कल्याण : डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात महिला डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांवरील मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी तथा शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या कोठडीसंदर्भातील सुनावणीत कल्याण न्यायालयाने महत्त्वाची भूमिका घेतली. प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण देत रमेश म्हात्रे यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्याची मागणी बचाव पक्षाने केली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी मान्य करण्यास नकार देत आरोपीला प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com