डोंबिवली: गंभीर गुन्ह्यातील आरोपींची करायचा सुटका; वकीलासह पाच जणांना अटक

कल्याण गुन्हे शाखा विभागाची कारवाई
culprit arrested
culprit arrestedsakal media

डोंबिवली : गंभीर गुन्ह्यातील अटक आरोपींना न्यायालयातून जामिन मिळवून देण्यासाठी न्यायालयात बोगस जामिनदार (fake witness) सादर करायचे, त्यांचे बनावट कागदपत्र (Fake documents) तयार करुन ते सर्व न्यायालयात हजर करुन आरोपींची सुटका करणाऱ्या वकीलासह पाच जणांच्या टोळीला (culprit arrested) कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. महमद रफिक अब्दुल सत्तार शेख (वकील), जयपाल समाधानम जोगीरी, संतोष कन्हैयालाल मौर्या, महमद हबीब महमद रफीक हाश्मी, चंदू उर्फ चंद्रकांत अर्जुन खामकर अशी अटक आरोपींची नावे आहेत. मंगळवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात त्यांना हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे (Kalyan crime branch) वरिष्ठ पोलिस निरिक्षक किशोर शिरसाठ यांनी दिली.

culprit arrested
सांगली : जि. प. अध्यक्षांच्या बंगल्यावर हल्ला! सभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक किशोर शिरसाठ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की काही व्यक्ती या गंभीर गुन्ह्यातील अटक आरोपींना कोर्टात बनावट जामीनदार म्हणून बनावट कागदपत्रे तयार करुन जामीन करुन देतात. बनावट जामीनदार म्हणून देखील ते हजर होत असतात. त्यादृष्टीने तपास सुरु होता, याचदरम्यान सोमवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात दाखल डोंबिवली रेल्वे गुन्ह्यातील अटक आरोपीला जामिन मिळवून देण्यासाठी हे आरोपी येणार असल्याची माहिती शिरसाठ यांना मिळाली होती.

त्यानुसार शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक भूषण दायमा, पोलिस उपनिरिक्षक मोहन कळमकर, संजय माळी, बापुराव जाधव, किशोर पाटील, गुरुनाथ जरग, विनोद चन्ने, मोहन खंडारे, राहूल इसी, मिथुन राठोड यांच्या पथकाने कोर्टात सापळा रचुन जामीन देण्याच्या कामासाठी आलेल्या चार आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी बनावट रेशनिंग कार्ड तयार करुन बोगस जामिनदार कोर्टात उभे करुन गंभीर गुन्ह्यातील आरोपींना जामिन मिळवून देत असल्याचे सांगितले.

या प्रकरणात वकील महमद रफिक अब्दुल सत्तार शेख, आरोपीचे वडील हबीब हाश्मी, बोगस जामिनदार संतोष मौर्या, जयपाल जोगिरी आणि कागदपत्र तयार करुन देणारा चंद्रकांत खामकर यांना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपी हे रहाणारे मुंबई, वसई येथील राहणारे आहेत. सर्व पाचही आरोपींना कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करीत मंगळवारी त्यांच्याविरोधात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींनी किती गुन्ह्यातील आरोपींना बनावट जामिनदार सादर करुन जामिन मिळवून दिला आहे. तसेच या कामासाठी त्यांना आणखी कोणाचा हातभार होता आदि गोष्टींचा सखोल तपास करण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शिरसाठ यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com