esakal | कुत्रा चावल्याने त्याचा संताप अनावर; कुत्र्याला धाडले थेट यमसदनी
sakal

बोलून बातमी शोधा

कुत्रा चावल्याने त्याचा संताप अनावर; कुत्र्याला धाडले थेट यमसदनी

कुत्रा चावल्याच्या रागातून अजय मगरे या तरुणाने कुत्र्याला जीवे मारल्याची घटना सोमवारी रात्री डोंबिवलीत घडली.

कुत्रा चावल्याने त्याचा संताप अनावर; कुत्र्याला धाडले थेट यमसदनी

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कुत्रा चावल्याच्या रागातून अजय मगरे या तरुणाने कुत्र्याला जीवे मारल्याची घटना सोमवारी रात्री डोंबिवलीत घडली. याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अजय याला अटक केली आहे.

डोंबिवली पश्चिमेतील कोपर रोड येथील मिनाताई उद्यानाची देखभालीचे काम गेल्या चार वर्षापासून अजय नायडू हे करीत आहेत. उद्यानाच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी शेरु नावाचा कुत्राही पाळला होता. उद्यान बंद केल्यानंतर नायडू हे शेरुला उद्यानात मोकळे सोडीत असत. 19 फेब्रुवारीला दुपारी 2.30 च्या सुमारास अजय मगरे हा दारु पिऊन गार्डन जवळ आला असता नायडू यांनी त्याला उद्यान बंद झाले असल्याचे सांगितले. परंतू अजयने ते न ऐकता भिंतीवरुन उडी मारुन उद्यानाच्या आत गेला. अजयवर भूंकून शेरुने त्याच्या हाताला चावा घेतला.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

नायडू यांनी अजय याला उपचारासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात त्वरीत नेले. तेथे उपचारा दरम्यानच अजयने नायडू यांना कुत्र्याला मारुन टाकण्याची धमकी दिली होती. परंतू अजय दारुच्या नशेत असल्याने असे बोलत असेल असे वाटल्याने नायडू यांनी त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. सोमवारी रात्री नायडू हे उद्यान बंद करण्यासाठी गेले असता त्यांनी शेरुला आवाज दिला परंतू त्याचा प्रतिसाद आला नाही. त्याचवेळी नायडू यांच्या परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने त्यांना अजयने शेरुला मारुन गोणीत भरुन कचराकुंडीत टाकल्याची माहिती दिली. नायडू यांनी कचरा कुंडीतील गोणीत पाहिले असता त्यांना शेरु मयत अवस्थेत आढळून आल्याचे नायडू यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

----------------------------------------

kalyan crime marathi news Ajay Magare killed dog in Dombivali live mumbai update