
Police escorting the accused in the Kalyan gangrape case involving a minor girl.
esakal
कल्याणमध्ये नर्सिंग शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ८ जणांनी वेळोवेळी सामूहिक अत्याचार केला, त्यात नातेवाईकाचाही समावेश आहे.
गर्भधारणा झाल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी ८ पैकी ७ आरोपींना अटक केली आहे.
न्यायालयीन सुनावणीत आरोपींच्या वकिलांनी मुलीच्या वयाबाबत शंका उपस्थित केली असून पुढील चौकशी सुरू आहे.
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची संतापजनक घटना समोर आली आहे. तब्बल आठ जणांनी वेळोवळी पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले. यातील एक आरोपी हा मुलीचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.