

Kalyan Singham Action
esakal
डोंबिवलीः कल्याण पूर्वेतील आत्मारामनगर परिसरात वाहनाला कट लागण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गुंडांच्या गटांमध्ये झालेला वाद थेट गोळीबारापर्यंत पोहोचला. या घटनेत एका निष्पाप नागरिकाला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेत कठोर कारवाई केली. गुंडांना चोप देतानाचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, वाढत्या गुंडगिरीविरोधात पोलिसांनी दाखवलेल्या आक्रमक भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.