कल्याण - केडीएमटी लेखापालाच्या खुलाश्याने सभा गाजली

रविंद्र खरात 
सोमवार, 2 एप्रिल 2018

कल्याण : केडीएमटीच्या बसेस दुरुस्ती, ठेकेदाराचे बिल, पगार देणे यात घोळ आहे हा आरोप खोटा असून मी एकटा जबाबदार नसून माझ्या बरोबर व्यवस्थापक आणि सभापती जबाबदार आहेत, ते सांगतात तेव्हा मी काम करतो असा खुलासा केडीएमटी लेखापाल सुधाकर आठवले यांनी आज सोमवारी (ता. 2) झालेल्या कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समितीच्या सभेत केल्याने सभा चांगलीच गाजली.

कल्याण : केडीएमटीच्या बसेस दुरुस्ती, ठेकेदाराचे बिल, पगार देणे यात घोळ आहे हा आरोप खोटा असून मी एकटा जबाबदार नसून माझ्या बरोबर व्यवस्थापक आणि सभापती जबाबदार आहेत, ते सांगतात तेव्हा मी काम करतो असा खुलासा केडीएमटी लेखापाल सुधाकर आठवले यांनी आज सोमवारी (ता. 2) झालेल्या कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समितीच्या सभेत केल्याने सभा चांगलीच गाजली.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन समिती (केडीएमटी) ची सभा आज सोमवारी (ता. 2 ) पालिका मुख्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील स्थायी समितीच्या सभागृहात संपन्न झाली. केडीएमटी ताफ्यातील व्हॉल्वो एसी बसेस ऐन उन्हाळ्यात रस्त्यावर धावत नसल्याचे शिवसेना समिती सदस्य संतोष चव्हाण यांनी प्रस्ताव मांडत उपन्न घटत असून कार्यशाळेच्या दुर्लक्षामुळे होत असल्याचा आरोप करण्यात आला. हा विषय चांगलाच गाजला. यावेळी सभापती सुभाष म्हस्के यांनी सांगितले की, मागील आठवड्यात डेपोत दौरा केला वेळेवर ठेकेदाराचे पैसे न दिल्याने बसेस दुरुस्त होत नाही तर सुट्टे ही पार्ट खरेदी न केल्याने बसेस डेपो मध्ये उभ्या असल्याने बसेस वेळवर बसेस धावत नसून उत्पन्न बुडत असल्याचे सभापती म्हस्के यांनी स्पष्ट केले.

यावेळी सदस्यांनी गदारोळ करत लेखापाल सुधाकर आठवले याना अडचणीत आणत मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत आठवले यांना घरी पाठवा अशी मागणी यावेळी सदस्यांनी केली या आरोपाला उत्तर देताना केडीएमटी लेखापाल सुधाकर आठवले यांनी खुलासा केला की पालिका कडून अनुदान मिळते तसे बिल आणि पगार काढतो मात्र बिल उशीरा निघतो, पगार उशिरा निघतो याला केवळ मी जबाबदार नसून व्यवस्थापक आणि सभापती यांचे आदेश ही असतात तसे काम करावे लागते, या खुलासाने सदस्यांनी गदारोळ केला मात्र व्यवस्थापक सुरेश पवार आणि सभापती सुभाष म्हस्के यांनी मौन धारण करत सभा सुरू ठेवली.

घोटाळ्याची केडीएमटी 
केडीएमटी वाहतूक विभाग, कार्यशाळा आणि प्रशासनामधील अधिकारी कर्मचारी वर्गामुळे केडीएमटी मध्ये अनेक घोटाळे होत असल्याचे आज झालेल्या सभेत पुन्हा समोर आले मात्र परिवहन समिती सदस्याच्या गटबाजीमुळे ते अधिकारी आणि कर्मचारी सूटत असल्याचे समोर आले .

मनमानी कारभार 
नागरिकांच्या सुविधा मिळावी यासाठी केडीएमटी बसेसचे वेळापत्रक ठरविले जाते मात्र समिती ला न विचारता परस्पर बसेसचे वेळापत्रक ठरविले जात असल्याचे परिवहन समिती सदस्य मधुकर यशवंतराव यांनी उघड केले यावेळी कर्मचारी वर्ग आपल्या सवडीनुसार येत असल्याने बसेस सोडल्या जात असल्याची माहिती सभागृहात श्याम पष्टे यांनी देताच पुन्हा कर्मचारी वर्गाचा मनमानी कारभार पुन्हा समोर आला.

सभापती सुभाष म्हस्के यांची आज पहिलीच सभा होती मात्र आज पहिल्या दिवशी शिवसेना सदस्यांनी प्रशासनावर ताशेरे ओढत सभापती सुभाष म्हस्के आणि प्रशासनाला चांगलेच अडचणीत आणल्याची चर्चा रंगली होती.

प्रभारी कार्यशाळा प्रमुख अनंत कदम यांच्या राजीनामा, बसेस वेळापत्रक कोलमडले, नोकर भरती, बिल काढणे, डेपो विकसित करणे या विषयावर चांगलीच सभा वादळी ठरली तर या विषयावर सभापती सुभाष म्हस्के, नितीन पाटील, संजय राणे, प्रसाद माळी, मधुकर यशवंतराव, राजेंद्र दीक्षित, संजय पावशे, संतोष चव्हाण, प्रल्हाद म्हात्रे, आदींनी सहभाग घेतला होता .

Web Title: kalyan dombivali municipal corporation meeting