स्वतःचा पगार येणार की नाही ठाऊक नाही, मात्र अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसाठी 'ते' देतायत सेवा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 मार्च 2020

संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या नागरिकांची ने-आण करण्यासाठी केडीएमटी धावतेय. मात्र कर्मचारीवर्गाचे पगार कसे काढणार असा प्रश्न प्रशासनासमोर आहे

कल्याण : डबघाईला आलेल्या केडीएमटीने संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या नागरिकांना घर ते काम अशी सेवा देण्यास सुरुवात केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र व्यवसाय होत नसल्याने पुढील महिन्यात केडीएमटीच्या कर्मचारी वर्गाला पगार कसा द्यायचा असा प्रश्न प्रशासन समोर उभा राहिला आहे. 

करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसाचा लॉक डाऊन घोषित केल्याने रेल्वे, बस, रिक्षासेवा बंद झाल्याने आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मात्र ड्युटीवर जाण्यासाठी अडचण होऊ नये यासाठी पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या आदेशानुसार केडीएमटी व्यवस्थापक मारुती खोडके यांनी प्रति दिन 14 ते 16 बसेस उपलब्ध केल्या आहेत. नर्स, सफाई कर्मचारी आणि पोलिस बांधवांना प्रवास करण्यासाठी याचा उपयोग होत असून केडीएमटी बसेस दिल्याने त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

 हेही वाचा लॉकडाऊनमध्ये 'अशी' कमी करा दारूची तलफ 

कल्याण ते टिटवाळा, कल्याण ते डोंबिवली, अंबरनाथ ते कल्याण, बदलापूर ते कल्याण, महात्मा फुले पोलिस ठाणे ते बदलापूर पोलीस विशेष बस, कल्याण ते आसनगाव , कल्याण ते विक्रोळी, या मार्गावर सकाळी साडे पाच ते रात्री दहा पर्यँत या बसेस धावत असून अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाला मोफत प्रवास देत असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे . 

संचारबंदीचा KDMT ला फटका 

केडीएमटीमध्ये 500 हुन अधिक कर्मचारी, अधिकारी काम करत आहेत. त्यांचा पगार पालिकेने दिलेल्या अनुदानावर भागवला जातोय. सध्या संचारबंदी असल्याने व्यवसाय पूर्ण पणे बंद असल्याने दररोजच्या 3 ते 4 लाख रुपयांचा तोटा होतोय. यामुळे इंधन खरेदी आणि कर्मचारी वर्गाचा पगार कसा काढायचा याबाबत पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी काय भूमिका घेतात याकडे लक्ष्य लागलंय. याबाबतीत निर्णय न झाल्यास केडीएमटीच्या वाहक चालक आणि अधिकारी कर्मचारी वर्गावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही .

वर्क फ्रॉम होम करतायत? दिवसभर बेडवर बसून तासंतास काम करणं योग्य नाही, काय होतं वाचा...

kalyan dombivali municipal corporation transport system is running for emergency services


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kalyan dombivali municipal corporation transport system is running for emergency services