कल्याण-डोंबिवलीचे पाणी महागणार! 

रवींद्र खरात
मंगळवार, 28 जानेवारी 2020

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत होणारा पाणी पुरवठा "ना नफा ना तोटा' या तत्त्वावर केला जातो. मात्र त्यावर होणारा जमा खर्च यामध्ये ताळमेळ ठेवताना पाणी पुरवठा विभागाला तारेवरची कसरत करावी लागते. म्हणूनच केंद्र आणि राज्य सरकारचे घेतलेले कर्ज फेडण्यासाठी, उत्पन्न वाढीसाठी महापालिका पाणी पुरवठा विभागाने पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रस्ताव बनविला असून, बुधवार (ता. 29) तो स्थायी समिती सभेत ठेवण्यात आला आहे. त्यावर आज निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 

कल्याण (बातमीदार) : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत होणारा पाणी पुरवठा "ना नफा ना तोटा' या तत्त्वावर केला जातो. मात्र त्यावर होणारा जमा खर्च यामध्ये ताळमेळ ठेवताना पाणी पुरवठा विभागाला तारेवरची कसरत करावी लागते. म्हणूनच केंद्र आणि राज्य सरकारचे घेतलेले कर्ज फेडण्यासाठी, उत्पन्न वाढीसाठी महापालिका पाणी पुरवठा विभागाने पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रस्ताव बनविला असून, बुधवार (ता. 29) तो स्थायी समिती सभेत ठेवण्यात आला आहे. त्यावर आज निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 

गुजरातमधून येणारा 'हा' पदार्थ तुम्हाला आजारी पाडू शकतो

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या हद्दीत प्रतिदिन 310 लाख लीटर पाणी पुरवठा केला जातो. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे 1 जून 2015 पासून पालिकेतील 27 गावांसाठी प्रतिदिन 50 लाख लीटर असे एकूण 360 लाख लीटर पाणी प्रतिदिन पुरवठा करण्यात येते. पालिकेला उल्हास नदीवर 234 लाख लीटर पाणी प्रतिदिन कोटा मंजूर आहे. बारवी धरणाची उंची वाढवल्यामुळे भविष्यात प्रतिदिन 86 लाख तर 27 गावांतील योजनेसाठी 105 लाख लीटर प्रतिदिन पाणी आरक्षणाला मान्यता देण्यात आली आहे. 

सायन-दादर प्रवासासाठी 6000 रुपये!

बारावे जलशुद्धीकरण केंद्र, टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्राव्यतिरिक्त जे. एन. एन. यु. आर. एम. योजनेंतर्गत मोहिली येथे 100 लाख, नेतीवली येथे 150 लाख लीटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारून तेथून नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. वाढती महागाई, दुरुस्ती, आस्थापना खर्च, रसायन खर्च, विद्युत बिले या समवेत केंद्र आणि राज्य सरकारचे कर्ज परतफेड आदी कारणास्तव जमा खर्चाचा ताळमेळ बसवताना पाणी पुरवठा विभागाला तारेवरची कसरत करावी लागते. यासाठी पाणी पुरवठा विभागाने 2020-21 या वर्षासाठी पाणी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

असे आहेत दर 

  • सर्व प्रकारच्या घरगुती वापरासाठी प्रतिमाह/प्रति कुटुंब 22.5 घनमीटरपर्यंत 2019-2020 मध्ये सात रुपये दर होता तो तीन रुपयाने वाढ करत 2020-2021 मध्ये 10 रुपये प्रतिघनमीटर प्रस्तावित आहे. 
  • धार्मिक स्थळांसाठी 15 रुपये असलेला दर प्रतिघनमीटर 20 रुपये असा प्रस्तावित आहे. किराणा स्टोअर्स, ज्वेलर्स, चहा टपरी, छोटी दुकाने, नाट्यगृह, पेट्रोल पंप आदींना प्रति घनमीटर 30 रुपये असलेला दर 40 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. 
  • रुग्णालयांमध्ये 6 ते 15 खाटांच्या रुग्णालयासाठी 30 चे 40 रुपये प्रतिघनमीटर दर प्रस्तावित करण्यात आले आहे. 16 खाटांपुढील रुग्णालय, छोटे कारखाने, सरकारी-निमसरकारी कार्यालयांना 50 रुपयांवरून 60 रुपये दर प्रस्तावित आहे. 
  • बार, परमिट रूम, उपहारगृह, मंगल कार्यालय, लॉजिंग बोर्डिंग, कारखाने, इमारत बांधकामांना 60 रुपयांवरून 70 रुपये दर प्रस्तावित करण्यात आला आहे. 
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalyan-Dombivali water to be expensive!