Water Supply Close : कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा मंगळवारी 9 तास बंद

टाटा पॉवर कांबा सबस्टेशन मधील फिडरचे देखभाल दुरुस्तीचे काम मंगळवारी करण्यात येणार आहे.
Water supply close
Water supply closeesakal

डोंबिवली - टाटा पॉवर कांबा सबस्टेशन मधील फिडरचे देखभाल दुरुस्तीचे काम मंगळवारी करण्यात येणार आहे. यासोबतच बारावे, मोहिली, नेतिवली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत व यांत्रिकी उपकरणांची देखभाल दुरूस्तीचे काम करण्याकरिता मंगळवारी शटडाऊन घेण्यात येणार आहे. या कामानिमित्त मंगळवारी 9 तासासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 150 द.ल.ली. मोहिली उदंचन केंद्र (नेतिवली ज.शु.के.) व 100 द.ल.ली. मोहिली जलशुद्धीकरण केंद्र येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. मार्फत टाटा पॉवर कांबा सबस्टेशन येथुन विद्युत पुरवठा केला जातो.

टाटा पॉवर कंपनीचे ग्रुप हेड कल्याण नोड यांनी टाटा पॉवर कांबा सबस्टेशनमधील एनआरसी 2 फीडरच्या देखभाल व दुरुस्तीचे काम मंगळवारी केले जाणार आहे. यानिमित्ताने 12 मार्चला शट डाऊन घेण्यात येणार असल्याबाबत कळविलेले आहे.

तसेच सदर दिवशी बारावे, मोहिली, नेतिवली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत व यांत्रिकी उपकरणांची देखभाल दुरूस्तीचे काम करण्याकरिता मंगळवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत महापालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रामधून कल्याण (पूर्व व पश्चिम), कल्याण ग्रामिण विभाग (मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी व कल्याण ग्रामीण विभागातील इतर गावे) व डोंबिवली (पूर्व व पश्चिम) परिसरास होणार पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे पालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com