
डोंबिवली : स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला कत्तलखाना तसेच चिकन मटन विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय केडीएमसी प्रशासनाने घेतला आहे. त्यासंबंधी नोटीसा त्यांनी विक्रेत्यांना दिल्या आहेत. 1988 सालापासून पालिकेत हा निर्णय लागू असला तरी आत्ता मात्र याला सर्वच स्तरातून विरोध होऊ लागला आहे. राजकीय प्रतिक्रिया याविरोधात उमटल्यानंतर आता खाटीक समाजाने देखील याला विरोध दर्शविला असून सर्वसामान्य नागरिकांनी देखील आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणू नका असे मत व्यक्त केले आहे. तर दहा पंधरा वर्षापासून पालिका हा निर्णय घेत आली असून फार वेगळं काही आपण केलेले नाही असे पालिका आयुक्तांनी सांगितले आहे.