Trading Scam: ट्रेडिंग करा, लाखो रुपये कमवा! नफ्याच्या आमिषाला बळी पडून ५० ते ६० विद्यार्थ्यांची फसवणूक

Fraud Case : कल्याण-डोंबिवली परिसरात ५० ते ६० विद्यार्थ्यांची ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणात विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडून लाखो रुपयांची व्यवहार उलाढाल झाले आले.
Trading Scam

Trading Scam

ESakal

Updated on

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली परिसरात १८ ते १९ वयोगटातील विद्यार्थ्यांना ट्रेडिंगच्या प्रलोभनाने गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे. ठगांनी ५० ते ६० विद्यार्थ्यांकडून विविध कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावावर बँक खाती उघडली आणि त्या खात्यांमधून लाखो रुपयांची उलाढाल केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाची दखल घेत शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना घेऊन परिमंडळ तीनचे उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com