Kalyan-Dombivli meat sale ban: मांस विक्रीवरील बंदीच्या निर्णयावर 'कल्याण-डोंबिवली' महापालिका आयुक्त गोयल ठाम!

Kalyan-Dombivli Municipal Corporation Commissioner Goyal: बंदीच्या मुद्यावरुन शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्धवल्यास तो प्रश्न पोलिस हातळणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
Kalyan-Dombivli Municipal Commissioner Goyal reiterates firm commitment to enforcing the meat sale ban despite public debate.
Kalyan-Dombivli Municipal Commissioner Goyal reiterates firm commitment to enforcing the meat sale ban despite public debate. esakal
Updated on

Kalyan-Dombivli Municipal Corporation Confirms Meat Sale Ban: कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत 15 ऑगस्टला मांस विक्री करण्यावर पालिका प्रशासनाने बंदी घातली आहे. या निर्णयावरून पालिका प्रशासनावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. मात्र पालिका प्रशासन आपल्या निर्णयावर कायम आहे. पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत कत्तलखाने व मास विक्री करण्यास बंदी आहे, मात्र मांस खाण्यावर आणि खरेदीवर कोणत्याही प्रकारची बंदी नाही, अशी माहिती दिली आहेत.

स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी घालण्याची सूचना पालिका आयुक्तांनी जारी केला. आणि यावरून राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटल्या. विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी केडीएमसीला लक्ष्य केले. पालिका प्रशासनाला या संदर्भात निवेदने देऊन हा निर्णय मागे घ्यावा. अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्धवू शकतो असे सूचित केले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर केडीएमसी आयुक्त गोयल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी मांस विक्री बंदीचा घेतलेल्या निर्णयावर ते ठाम आहेत असे स्पष्ट केले आहे.

आयुक्त गोयल म्हणाले, दरवर्षीच ही सूचना केली जात असून यावर्षी काहीही वेगळे केले गेलेले नाही. 1988 साली तत्कालीन आयुक्तांनी या संदर्भातील ठराव मंजूर केला होता. शासन निर्णय आणि तत्कालीन आयुक्तांचा ठरावानुसार हा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी दरवर्षी केली जाते. स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रशासक म्हणून एखादा निर्णय घेता येतो. अन्य महापालिकांनी कोणत्या आधारे त्यांच्या हद्दीत मांस विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला याबाबत मी काही सांगू सकत नाही.

Kalyan-Dombivli Municipal Commissioner Goyal reiterates firm commitment to enforcing the meat sale ban despite public debate.
2500 Dogs Killed and Buried: ‘’मी तेव्हा २५०० कुत्रे मारून झाडांखाली पुरले होते'’ आमदाराचं थेट विधिमंडळातच विधान!

मात्र विविध राजकीय पक्षांनी दिलेली निवेदने पाहता या निर्णयावर फेरविचार होऊ शकतो. फेर विचार झाल्यास तो देखील कळविला जाईल. मात्र बंदीच्या मुद्यावरुन शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्धवल्यास तो प्रश्न पोलिस हातळणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

Kalyan-Dombivli Municipal Commissioner Goyal reiterates firm commitment to enforcing the meat sale ban despite public debate.
Rahul Gandhi Life Threat: ‘’माझ्या जीवाला धोका…’’ ; राहुल गांधींकडून पुणे कोर्टात अर्ज अन् महात्मा गांधींच्या हत्येचाही उल्लेख!

पालिका प्रशासनाच्या या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस नवीन सिंग म्हणाले, आयुक्तांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे. 1988 चा जीआर असल्याचे ते सांगतात. आयुक्तांनी 1988 चा जो भ्रष्टाचार विरोधी कायदा आहे त्याप्रमाणे काम करायला पाहिजे. 15 ऑगस्टला त्यांनी शपथ घ्यायला पाहिजे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मी कोणताही भ्रष्टाचार होऊ देणार नाही. पालिकेच्या रस्त्यांवर जे खड्डे पडलेले आहेत त्याला जबाबदार जे कंत्राटदार आहेत. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून महानगरपालिकेत भ्रष्टाचार होऊ देणार नाही. येथे जे अनाधिकृत बांधकाम करण्यात येत आहे त्याच्यावर शपथ घेऊन सांगायचं की यातही भ्रष्टाचार होऊ देणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com