केडीएमसीत विनयभंग प्रकरण! गुन्हा दाखल होताच लिपिक निलंबित, तक्रारदार महिलेची बदली

KDMC Crime: केडीएमसीतील एका लिपिकाने महिला कर्मचाऱ्यासोबत अश्लील वर्तन केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी संबंधित लिपिकावर गुन्हा दाखल होताच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
KDMC

KDMC

Esakal

Updated on

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील विनयभंगाच्या गंभीर प्रकरणामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, गुन्हा दाखल होताच संबंधित लिपिकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. २७ गाव हद्दीतील ई प्रभागात कार्यरत असलेले लिपिक भूषण बळीराम पाटील यांच्याविरोधात महिला कर्मचाऱ्याने अश्लील वर्तनाचे आरोप करत मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा नोंदविल्यानंतर आयुक्त अभिनव गोयल यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ अंतर्गत गुरुवारी त्यांना सेवेतून निलंबित केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com