कल्याण डोंबिवली वाहतूक पोलिस विभागही झाला पेपर लेस

रविंद्र खरात 
बुधवार, 27 मार्च 2019

कल्याण - कल्याण डोंबिवली करानो कुठलेही वाहन चालविताना नियम तोडताना जरा विचार करा. वाहतुकीचे नियम तोडल्यानंतर दंड भरला नाही तरी त्याची नोंदणी वाहतूक पोलिसांकडे राहणार असून, आता कागदी पावती देणारे वाहतूक पोलिस ई चलन तुमच्या हाती देणार आहे.

मुंबई ठाणे पाठोपाठ कल्याण वाहतूक पोलिस विभाग ही आता पेपर लेस झाला असून, पूर्वी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना कागदी पावती देत होते. आता ई चलन पावती देण्यास सुरुवात झाली आहे. कल्याण पूर्व वाहतूक शाखा आणि कल्याण पश्चिम वाहतूक शाखेकडे एकूण 30 ई चलन मशीन आल्या असून मागील महिनाभरात कल्याण पश्चिम वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद गँभिरे यांच्या पथकाने 3 हजार हुन अधिक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना ई चलन दिले असून 6 लाखाहून अधिक दंड वसूल केला आहे. तर कल्याण पूर्व वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र शिरसाठ यांच्या पथकाने 2 हजार 200 हुन अधिक बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करत त्यांना ई चलन देत 6 लाखाहून अधिक दंड वसूल केला आहे.

Web Title: Kalyan Dombivli Traffic Police Department also became paper lease