
डोंबिवली : टाटा पॉवर कांबा सबस्टेशनमधील एनआरसी २ फीडरच्या देखभाल व दुरुस्तीचे काम मंगळवारी (ता. १) हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्या दिवशी वीजपुरवठा बंद राहणार असल्याने मोहिली व नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा होणार नसल्याने कल्याण-डोंबिवलीतील काही भागात मंगळवारी पाणी येणार नसल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.