KDMC Budget Session 2023: समोर आयुक्त अर्थसंकल्प मांडतायत अन् अधिकारी Whatsapp वर चॅटिंग करतायत...

या घटनेचा व्हिडीओही आता समोर आला आहे.
KDMC Budget Session 2023 News Updates
KDMC Budget Session 2023 News UpdatesSakal

KDMC Budget Session 2023 News: कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला. यावेळी काही अधिकाऱ्यांचा व्हिडीओ समोर आला आहे. हे अधिकारी अर्थसंकल्प सुरू असताना मोबाईलमध्ये बघण्यात व्यस्त होते, असं दिसत आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेचा महापालिका आयुक्तांनी २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प आयुक्त वाचून दाखवत असताना मात्र समोर सभागृहात बसलेले अधिकारी मात्र मोबाईव व्यस्त होते. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

KDMC Budget Session 2023 News Updates
UAPA बाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! आता बंदी असलेल्या संघटनेच्या सदस्यांवरही होणार कारवाई

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सोयी सुविधांशी निगडित असलेल्या विषयांवर महापालिका अधिकाऱ्यांना किती गांभीर्य आहे,हे दिसून येते.विशेष म्हणजे हा प्रश्न आयुक्तांना विचारला असता त्यांनी हसून उत्तर दिलं. (Marathi Tajya Batmya)

ते सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होते, आता ते ऑफिसचं काम करत होते की आणखी काही करत होते, हा बघण्याचा विषय आहे, असं उडवाउडवीचं उत्तर आयुक्तांनी दिलं आहे. (Latest Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com