कल्याणमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक लवकरच 

रविंद्र खरात 
मंगळवार, 3 एप्रिल 2018

कल्याण - कल्याण पुर्वमधील भिमसैनिकांना व आंबेडकरी जनतेला नागरिकांना खुषखबर आहे. पालिकेच्या ड प्रभाग क्षेत्र कार्यालय जवळ उभे राहणाऱ्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाला महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागानेही 'ना हरकत' प्रमाणपत्र दिले आहे. शासन निर्णय परिपत्रकास अधिन राहून महाराष्ट्र शासनाचे सचिव नवनाथ वाठ यांच्या स्वाक्षरीने हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. आमदार गणपत गायकवाड तसेच महापौर राजेंद्र देवळेकर यांना यांच्याजवळ हे प्रमाणपत्र सूपूर्त करण्यात आले.  यामुळे कल्याण पूर्व मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर  पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .

कल्याण पूर्व मधील पालिकेच्या ड प्रभाग कार्यलयाजवळ भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि भव्य स्मारक उभे राहणार आहे. यासाठी कल्याण पूर्व मधील आमदार गणपत गायकवाड यांनी शासनाकडून 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. पुतळ्याचे काम रखडल्याने कल्याण पूर्व मधील भिमसैनिकांनी मागील वर्षी 8 डिसेंबर 2017 पासून साखळी उपोषण केले होते. सलग चार दिवस उपोषण सुरू होते. यावेळी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या दालनात महत्वपूर्ण बैठक झाली होती. त्यावेळी 14 एप्रिल पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि स्मारक पूर्ण करण्याचे आश्वासन महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिले. तर शासन दरबारी ज्या परवानगी आहेत त्याचा पाठपुरावा करू असे आमदार गणपत गायकवाड यांनी आश्वासन दिले होते. 

काही महिन्यापूर्वी शिल्पकार स्वप्निल कदम यांनी तयार केलेल्या पुतळ्याचे माती कामातील प्रतिकृती तयार केल्याने महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाच्या तज्ञ प्रतिनिधीने शिल्पकार स्वप्नील कदम यांच्या कला केंद्रास भेट देऊन पुतळ्याची पाहणी केली. पुतळ्याची प्रतिकृती कलात्मकदृष्ट्या योग्य झाली असल्याचा अहवाल कला संचालनालयाने अधिकृत पत्र कल्याण डोंबिवली महानगर पालिकेला पाठविले होते. त्यानंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नियोजित पुतळा बसविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने 'ना हरकत' प्रमाणपत्र दिले आहे. यामुळे कल्याण पूर्व मधील आंबेडकरी जनता आणि भीमसैनिकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: kalyan dr.babasaheb aambedkar smarak