
बकरी ईदनिमित्त दुर्गाडी किल्ला परिसरात मुस्लिम बांधव नमाज अदा करतायत. दरम्यान, किल्ल्यावर असलेल्या दुर्गाडी देवीच्या मंदिरात हिंदू बांधवांना प्रवेश करण्यास बंदी आहे. गेल्या ३५ वर्षांपासून बंदी हटवण्यासाठी शिवसेनेकडून दरवर्षी घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. आज सकाळीही दुर्गाडी किल्ल्यावर शिवसेनेकडून जोरदार आंदोलन करण्यात आलंय. शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि राजेश मोरे यांच्यासह समर्थकांनी आंदोलन केलं.