
ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये एका तरुणाने एका खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी तरुणाने रिसेप्शनिस्ट मुलीला किती क्रूरपणे मारहाण केली हे स्पष्टपणे दिसून येत आहे. यानंतर आता या घटनेत मोठा ट्वि्स्ट आला आहे. या घटनेच्या आधीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात मारहाण करण्यास कोणी सुरूवात केली, हे समोर आले आहे.