Dombivali News : कल्याण फेरीवाल्या प्रकरणी मनसे आक्रमक; आम्ही ठाकरे गट नाही आता अधिकाऱ्यांना ठोकू

कल्याण येथे एका विद्यार्थ्यांला अरेरावी करत मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या फेरीवाल्यांना मनसे पदाधिकाऱ्यांनी चोप दिला होता. याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता.
MLA Raju Patil
MLA Raju Patilsakal

डोंबिवली - कल्याण येथे एका विद्यार्थ्यांला अरेरावी करत मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या फेरीवाल्यांना मनसे पदाधिकाऱ्यांनी चोप दिला होता. याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात 6 ते 7 मन सैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यावर बुधवारी मनसे आमदार राजू पाटील यांनी थेट पोलीस ठाणे गाठले.

फेरीवाले तक्रार देण्यास तयार नाहीत, तर दबाव का टाकला जातो असा सवाल करत आम्ही ठाकरे गट नाही असे पोलिसांना खडसावले. फेरीवाल्यांना हटवले नाही तर त्यांना अभय देणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना ठोकू असा इशारा देखील दिला.

कल्याण स्कायवॉक वर मराठी भाषेविषयी अपशब्द वापरणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसैनिकांनी बेदम मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केले होते. मारहाणीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल करत फेरीवाल्यांना मराठी भाषेवर विधान केलं तर मनसे स्टाईल दाखवण्याचा इशाराही दिला होता.

सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल होताच याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी सहा ते सात मनसे कार्यकर्त्या विरोधात 24 तासानंतर फेरीवल्याचा जाब नोंदवून गुन्हा नोंदवला. यामुळे संतप्त झालेल्या मनसे पदाधिकारी कार्यकर्ता व मनसे आमदार राजू पाटील यांनी या संबंधित कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांची भेट घेतली.

याविषयी चर्चा केली यावेळेस मनसेकडून पोलीस दबाव टाकत फेरीवाल्यांना तक्रार देण्यासाठी सांगत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. ज्या फेरीवाल्याला मारहाण झाली होती. त्या फेरीवाल्याला पोलिसांच्या समोर उभा केले. मात्र पोलिसांवरती आरोप होत असल्याने पोलिसांनी त्या फेरीवाल्याला कार्यालयाच्या बाहेर काढत त्याच्यावरती मनसेच दबाव टाकला असल्याचा सांगितले.

यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होणमाणे यांच्या कार्यालयातच मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी नमटेपणा घेत माघार घेतल्यावर हे प्रकरण शांत झाले. मात्र यावेळी मनसैनिक व मनसे पदाधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांवरती कारवाई का होत नाही.

अनधिकृत फेरीवाल्यांना बाहेर काढा अन्यथा आता या फेरीवाल्यांच्या जागी त्यांना बसवणाऱ्या अधिकाऱ्यांनाच चोप देणार असल्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्त्यांवरती ज्याप्रमाणे गुन्हे दाखल होतात त्याप्रमाणे मनसैनिकावरती गुन्हे दाखल करता का? आम्हाला ठाकरे गट समजू नका असा इशाराही पोलिसांना दिला.

यामुळे पालिका व पोलीस यंत्रणा या फेरीवाल्यांचा बंदोबस्त केला नाही. तर आता या फेरीवाल्यांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांना ठोकू असा इशारा दिला आहे.

यामुळे भविष्यात फेरीवाल्यांचा मुद्दा वाढणार असून मनसे ॲक्शन मोड मध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com