कल्याण - पालिकेच्या घनकचरा विभागाच्या आरोग्य निरीक्षकासलाच घेताना अटक

रविंद्र खरात 
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

कल्याण - कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या जे/4 प्रभाग क्षेत्र कार्यालय मधील घनकचरा विभागात काम करणाऱ्या आरोग्य निरीक्षकास पाच हजार रूपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ अटक केली. 

कल्याण - कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या जे/4 प्रभाग क्षेत्र कार्यालय मधील घनकचरा विभागात काम करणाऱ्या आरोग्य निरीक्षकास पाच हजार रूपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ अटक केली. 

याबाबत ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहिती नुसार, याबाबत एकाने तक्रार केली होती. तक्रारदाराला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा विभागात वारसा हक्काने नोकरीमध्ये कायम करण्याकरिता मूल्यमापन अहवालावर शेरा हवा होता. त्याच्या नोंदविण्यासाठी कल्याण पूर्व मधील जे/4 पालिका प्रभाग क्षेत्र कार्यालय मधील घनकचरा विभाग मधील आरोग्य निरीक्षक मोहन राजाराम दिघे यांनी 10 हजार रुपयांची मागणी केली होती. 

आज मंगळवार ता 11 डिसेंबर रोजी सकाळी कार्यालय सुरू होताच कल्याण पूर्व पालिकेच्या जे/4 प्रभाग क्षेत्र कार्यालयात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून (पहिला हप्ता) पाच हजार रुपयांची लाच घेताना मोहन राजाराम दिघे याला रंगेहाथ अटक केली. दिघे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक अंकुश बांगर करत आहेत.

Web Title: Kalyan - Health Inspector of Municipal's corporation arrested