

Kalyan School Closed
ESakal
कल्याण : कल्याण पश्चिमेकडील बैलबाजार परिसरातील केडीएमसीची मुख्य जलवाहिनी फुटल्याचा फटका येथील शाळकरी विद्यार्थ्यांना बसला आहे. वाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी शाळेकडे जाणारा रस्ता बंद ठेवण्यात आल्याने येथील नामांकित के. सी. गांधी शाळा सलग तीन दिवस बंद ठेवण्यात आली आहे. त्याचा परिणाम हजारो विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे. वाहतूक पोलीस आणि केडीएमसी प्रशासनाकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी शाळा प्रशासनाकडून करण्यात आली आहे.