

Titwala Megablock
ESakal
मुंबई : टिटवाळ्यातील पॉइंटच्या टॅम्पिंगसाठी शुक्रवार-शनिवारच्या मध्यरात्री घेतलेल्या ब्लॉकमुळे चार लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर डोंबिवली आणि कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या दोन लोकल ठाण्यापर्यंतच धावणार आहेत. १८ सप्टेंबरच्या रात्री १२.४५ ते १९ सप्टेंबरच्या पहाटे २.१५ वाजेपर्यंत हा ब्लॉक राहणार असून, या काळात कल्याण-कसारादरम्यान लोकल सेवा बंद राहणार आहे.