Kalyan Latur Expressway Project Details
esakal
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे आणि कल्याण परिसराला थेट मराठवाड्याशी जोडणाऱ्या कल्याण-लातूर जनकल्याण एक्सप्रेसवेला राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. सुमारे 442 किलोमीटर लांबीचा, सहापदरी आणि पूर्णपणे ॲक्सेस कंट्रोल्ड ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे उभारण्यात येणार असून, या प्रकल्पासाठी तब्बल 35 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) या प्रकल्पाचे काम करण्यात येणार आहे.