Loksabha 2019 : देशातील मतदानाचा उच्चांक मोडण्याची कल्याण लोकसभेला संधी

दिनेश गोगी
सोमवार, 1 एप्रिल 2019

उल्हासनगर : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे नवखे असतानाही ते अडीच लाखाच्या वर मतदान घेऊन विजयी झाले आहेत. डॉ. शिंदे यांनी गेल्या पाच वर्षात कल्याण लोकसभेत यापूर्वी कधीही झालेच नव्हते अशी ऐतिहासिक विकासकामे केल्याने आणि आता खऱ्या अर्थाने प्रतिस्पर्धीच नसल्याने देशातील सर्वाधिक मतदानाचा उच्चांक मोडण्याची संधी असून ती दडवू नका असे आवाहन ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उल्हासनगरात केले. ते युतीच्या मेळाव्यात बोलत होते.

उल्हासनगर : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे नवखे असतानाही ते अडीच लाखाच्या वर मतदान घेऊन विजयी झाले आहेत. डॉ. शिंदे यांनी गेल्या पाच वर्षात कल्याण लोकसभेत यापूर्वी कधीही झालेच नव्हते अशी ऐतिहासिक विकासकामे केल्याने आणि आता खऱ्या अर्थाने प्रतिस्पर्धीच नसल्याने देशातील सर्वाधिक मतदानाचा उच्चांक मोडण्याची संधी असून ती दडवू नका असे आवाहन ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उल्हासनगरात केले. ते युतीच्या मेळाव्यात बोलत होते.
युतीच्या कार्यकर्त्यांनी ताठ मानेने मतदारां समोर जावे आणि विकासकामे सांगावे आणि मन जिंकण्याची किंबहूना वळवण्याचे काम करावे अशा सूचनाही एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

युती झाल्यानंतर महाराष्ट्रात सर्वप्रथम उल्हासनगरातील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अभिनंदनाची मोठमोठी पोस्टर्स झळकवले. हे शहर जिव्हाळ्याच असून 125 कोटींचे कामगार रुग्णालय,1 रुपी क्लिनिक, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कोट्यवधींची विकासकामे झालेली आहेत.पुढील पाच वर्षात हे शहर मागे वळून पाहणार नाही अशी विकासकामांची रणनीती आखण्यात आलेली आहे असे खासदार तसेच युतीचे उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.भाजपाचे जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी उल्हासनगरातून मतांचा रेकॉर्ड प्रस्थापित केला जाणार असे आश्वासन दिले आहे.मागच्या निवडणुकीत मतांची टक्केवारी वाढल्याने या शहरातून 68 हजार मते मिळाली होती.आयलानी यांनी ज्या विश्वासाने सांगितले तो पाहता ही मते डबल होणार असा विश्वास डॉ.शिंदे यांनीव्यक्तकेला.यावेळी रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण,भाजपाचे निरीक्षक शशिकांत शिंदे,आमदार डॉ.बालाजी किणीकर,भाजपाचे जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी, संपर्कप्रमुख नरेंद्र शिंदे, यांची यावेळी भाषणे झाली.मेळाव्याला उपस्थित हजारो युतीच्या कार्यकर्त्यांना फिर एक बार मोदी सरकार,पुन्हा डॉ. श्रीकांत शिंदे खासदार अशी शपथ नगरसेवक मनोज लासी यांनी दिली.

कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी,विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे,शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक राजेंद्रसिंग भुल्लर,गटनेते रमेश चव्हाण,ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख जयकुमार केणी,महिला आघाडी संघटक मनीषा भानुशाली,माजी महापौर लिलाबाई आशान,राजश्री चौधरी,अपेक्षा पाटील, मीना आयलानी, भाजपाच्या महिला अध्यक्षा मंगला चांडा,अर्चना करणकाळे, उपशहरप्रमुख राजेंद्र साहू, दिलीप गायकवाड,अरुण आशान, कैलास तेजी, संदीप गायकवाड,युवासेना अधिकारी सुमित सोनकांबळे, बाळा श्रीखंडे, विधानसभा संघटक सागर उटवाल,माजी शहरप्रमुख रमेश मुकणे, सुरेंद्र सावंत, भाजपाचे पदाधिकारी राजेश वानखेडे, प्रकाश माखिजा, महेश सुखरामानी, प्रदिप रामचंदानी, मनु खेमचंदानी आदी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान भाजपाच्या महापौर पंचम कलानी,युथ आयकॉन ओमी कलानी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव हे या मेळाव्याला अनुपस्थित राहिल्याने हा चर्चेचा विषय ठरला.

Web Title: Kalyan Loksabha constituency