Kalyan Loksabha Election : महाविकास आघाडीकडून वैशाली दरेकर राणे यांना उबाठा गटाकडून उमेदवारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विराधोत महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी दिली जाते याची उत्कंठा संपली.
vaishali darekar rane
vaishali darekar ranesakal

डोंबिवली - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विराधोत महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी दिली जाते याची उत्कंठा संपली असून वैशाली दरेकर राणे यांना उबाठा गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरेकर यांनी 2009 साली मनसेकडून लोकसभा निवडणूक लढवली होती.

त्यावेळी 1 लाखाच्या आसपास त्यांना मते पडून त्या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या होत्या. आता त्या शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूकीच्या रिंगणात उतरत असून खासदार शिंदे यांच्यापुढे कोणते आव्हान उभे करतात हे पाहणे औतुस्क्याचे ठरेल.

ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असून या जिल्ह्यातील ठाणे व कल्याण लोकसभा मतदार संघ आपल्या हातातून जाऊ नये यासाठी त्यांची लढाई सध्या सुरु आहे. महायुतीमधील मित्रपक्ष भाजपकडून त्यांची कोंडी होत असून सुपुत्र श्रीकांत याचा मतदारसंघ हा भाजपकडे जाऊ नये तसेच आनंद दिघे यांनी खेचून आलेला ठाणे मतदारसंघ देखील आपल्या हातून जाऊ नये यासाठी शिंदे गट प्रयत्नशील आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट असे वातावरण असल्याने त्याचा फायदा करुन घेण्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ठरविले आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे या नेत्यांनी कल्याण पूर्वेत सभा घेत हा मतदारसंघ गाजवला.

ठाकरे गट येथे आपली ताकद लावून शिंदे यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण करणार याची चर्चा आधीपासून येथे सुरु होती. ठाकरे गटाकडून माजी आमदार सुभाष भोईर, कॉंग्रेसचे संतोष केणे, केदार दिघे यांचे नाव आघाडीवर असतानाच ठाकरे यांनी माजी नगरसेविका वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करुन सर्वांना अवाक केले आहे.

मुळच्या शिवसैनिक असलेल्या वैशाली दरेकर यांनी मनसे पक्ष स्थापन झाल्यानंतर राज ठाकरे यांची साथ धरली होती. 2009 साली त्यांनी लोकसभा निवडणूक देखील मनसे पक्षाकडून लढली. यावेळी त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे वसंत डावखरे व शिवसेनेचे आनंद परांजपे यांचे आव्हान होते.

त्यांनी त्यावेळी 1 लाख मते घेत तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण केले होते. त्यानंतर मार्च 2016 ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत न जाता ठाकरे गटातच राहणे पसंत केले.

उद्धव ठाकरे यांची भेट झाली त्यादरम्यान त्यांनी लोकसभा निवडणूक तुम्ही लढविली होती. याविषयी विचारणा केली होती. त्यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीचा अनुभव आणि मताधिक्यांची माहिती दिली. परंतू आपल्याला उमेदवारी दिली जाईल याची खात्री दरेकर यांना नव्हती. पक्षप्रमुख ठाकरे यांनी दरेकर यांना उमेदवारी देत खुद्द दरेकर यांना देखील आश्चर्य चकीत केले आहे. दरेकर यांच्या उमेदवारीमुळे आता ठाकरे गटाकडून उमेदवार कोण याची उत्सुकता संपली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com