
Kalyan-Malshej Highway traffic changes
ESakal
उल्हासनगर : उल्हासनगरकरांनो, येत्या पंधरवडाभर आपल्या दैनंदिन प्रवासात मोठा बदल होणार आहे. शहाड उड्डाणपुलाच्या सशक्तीकरण आणि वेअरींग बदलाच्या कामामुळे २८ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान हा पूल पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी वाहतूक विभागाने विशेष अधिसूचना काढत पर्यायी मार्गांची घोषणा केली असून, सकाळ-संध्याकाळ अवजड वाहनांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. सुरक्षितता आणि सोयीसाठी नागरिकांनी याचा काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.