कल्याणमध्ये आमदाराने रस्त्यावर उतरून सोडविली वाहतूक कोंडी

रविंद्र खरात 
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

कल्याण : कल्याण पूर्व मधील धर्मवीर आनंद दिघे उड्डाणपुलावर रविवार (ता.18) रात्री साडेआठच्या सुमारास एक वाहन बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती यात आमदार गणपत गायकवाड ही अडकले होते. त्यांनी केवळ वाहतूक कोंडी कधी सूटेल याची वाट न पाहता स्वत: वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्त्यावर उतरले आणि वाहतूक कोंडी दूर केली . 

कल्याण : कल्याण पूर्व मधील धर्मवीर आनंद दिघे उड्डाणपुलावर रविवार (ता.18) रात्री साडेआठच्या सुमारास एक वाहन बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती यात आमदार गणपत गायकवाड ही अडकले होते. त्यांनी केवळ वाहतूक कोंडी कधी सूटेल याची वाट न पाहता स्वत: वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्त्यावर उतरले आणि वाहतूक कोंडी दूर केली . 

कल्याण मधील पत्रिपुल वरील वाहतूक कोंडीचा फटका कल्याण पूर्व पश्चिम मधील रस्त्यावर बसत आहे . रविवारी ठाणे मध्ये महापौर मेरोथॉन असल्याने कल्याण मधील अनेक वाहतूक पोलिस कर्मचारी वर्गाची नेमणूक ठाणे मध्ये केली होती तर अनेकांची सुट्टी असल्याने शहरात वाहतूक कोंडी झाली होती. ती दूर करण्यासाठी वाहतूक शाखेच्या वार्डन यांच्या वर जबाबदारी असून सायंकाळी साडे आठच्या सुमारास धर्मवीर आनंद दिघे उड्डाण पुलावर एक वाहन बंद पडल्याने कल्याण पूर्व मध्ये पूनालिंक रोडवर लांब लचक वाहनांची रांग लागली होती यात एक रुग्णवाहिका ही अडकली होती.

याच कालावधीत आमदार गणपत गायकवाड हे आपल्या कार्यकर्त्यां समवेत जात असताना त्यांना ही या वाहतूक कोंडीचा फटका बसला .ही वाहतुक कोंडी कधी दूर होईल याची वाट न पाहता आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्ते यांच्या समवेत रस्त्यावर उतरुन वाहतूक कोंडी दूर करत अडकलेल्या रुग्ण वाहिकेला वाट करून दिली . त्वरित त्यांनी वाहतूक पोलिसांना फोन करण्यास सुरुवात केली मात्र अनेकांचे फोन बंद होते. त्यांनी कंट्रोल रूमला फोन केल्यावर कोळशेवाडी पोलिस ठाणे मधून काही कर्मचारी आले तर काही महिला कर्मचारी मेरोथॉन येथील ड्युटी संपून घरी जात असताना त्यांना तेथे पाठविण्यात आल्याने आमदार गणपत गायकवाड यांनी संताप व्यक्त केला आहे.

कल्याण पूर्व मध्ये वाहतूक पोलिस केवळ टोइंग व्हॅन घेऊन सर्व सामान्य वाहन चालकांकडून चिरीमिरी घेण्यात मग्न असून वाहतूक कोंडी दूर करण्यास त्यांना वेळ नसल्याचा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे. दरम्यान साडे आठ ते साडे दहा तब्बल दोन तासाने वाहतूक कोंडी दूर झाल्यावर आमदार गणपत गायकवाड हे आपल्या कार्यकर्त्यासमवेत पुढील कार्यक्रमास निघाले. आमदार गणपत गायकवाड यांनी कोंडी दूर केल्या बाबत आज दिवसभर सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Kalyan, MLA resolves road traffic