रिक्षात एक नव्हे दोन नव्हे तीन नव्हे चक्क अठरा विद्यार्थी

रविंद्र खरात
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

कल्याणः एक नव्हे दोन नव्हे तीन नव्हे चक्क अठरा शाळकरी विद्यार्थी वर्गाची बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकाची वाहतूक पोलिसांनी जप्त करत, विद्यार्थी वर्गाला वाहतूक पोलिसांच्या वाहनातून शाळेत सोडण्यात आले. यामुळे शहरातील बेकायदा विद्यार्थी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कल्याणः एक नव्हे दोन नव्हे तीन नव्हे चक्क अठरा शाळकरी विद्यार्थी वर्गाची बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकाची वाहतूक पोलिसांनी जप्त करत, विद्यार्थी वर्गाला वाहतूक पोलिसांच्या वाहनातून शाळेत सोडण्यात आले. यामुळे शहरातील बेकायदा विद्यार्थी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कल्याण वाहतूक पोलिसांच्या वतीने बेशिस्त बाईकस्वार, रिक्षा चालक, मोटार चालकाविरोधात कारवाई सुरू आहे. आज (गुरुवार) दुपारी एकच्या सुमारास कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी जाधव यांच्या पथकाने बेशिस्त वाहन चालकाविरोधात कारवाई केली. यावेळी रिक्षा (क्रमांक एम एच 04 - 2144) कोन गावाकडून दुर्गाडी मार्गे कल्याण जात यात एक नव्हे दोन नव्हे तीन नव्हे चक्क 18 शाळकरी विद्यार्थी रिक्षा चालक घेऊन जात होता. बेकायदेशीर विद्यार्थी वाहतूक त्यात 16 वर्ष जुनी झालेली रिक्षा पाहता वाहतूक पोलिसांनी ती रिक्षा जप्त केली. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी त्यांच्या जीप मधून विद्यार्थ्यांना शाळेत सोडले. या वेळी 6 हून अधिक रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली, त्यात ही बेकायदा विद्यार्थ्याची वाहतूक केली जात होती. मात्र, या प्रकारामुळे बेकायदा विद्यार्थी वर्गाची प्रवासी वाहतूक प्रश्न ऐरणीवर आला आहे.

विद्यार्थी प्रवासी वाहतूक करण्यासंबधी राज्य शासनाने 2011 मध्ये धोरण जाहीर केले होते. प्रत्येक वाहन चालकांने आरटीओकडून परमिट घेणे आवश्यक आहे. आरटीओने प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी दिली तेवढेच विद्यार्थी घ्यावे. मात्र, हे सर्व नियम धाब्यावर बसवित असल्याचे आजच्या वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाई मुळे उघड झाले आहे. मोठी दुर्घटना झाल्यावर शाळा आणि पालक वर्गासमवेत सरकारी यंत्रणा जागे होणार का? असा सवाल केला जात आहे.

बेशिस्त वाहनचालकावर कारवाई सुरू असताना दुर्गाडी जवळ एक रिक्षा समोर आली चक्क 18 विद्यार्थी बसले होते. बेकायदा प्रवासी वाहतूक प्रकरणी त्याची रिक्षा जप्त केली तर अन्य 6 रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. पुढील आदेश येईपर्यंत बेकायदा विद्यार्थी वाहनचालकावर धडक कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती कल्याण वाहतूक शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी जाधव यांनी दिली.

Web Title: kalyan news eighteen students in rikshaw and Illegal travel issue